आपचे नेते मिडियावर पुन्हा घसरले,
केजरीवाल म्हणाले,सत्ता आली तर
मिडियावाल्यांना तुरूंगात टाकू
देशात क्रांती करण्यास आणि व्यवस्था परिवर्तनाची भाषा बोलणा़ऱ्या आम आदमी पक्षाचा दुटप्पीपणा जनतेसमोर मांड़ण्याचे आपले काम चोखपणे बजावणाऱ्या माध्यमांना आज अरविंद केजरीवाल,आणि आशूतोष यांनी धमक्या देत आपला मिडिया विरोध प्रकट केला.नव्हे ते मिडियावर अक्षरशः खवळले आहेत.त्यातूनच त्यांनी देशातील मिडिया विकला गेला असल्याचा आरोप केला आहे.
अरविद केजरीवाल आज नागपूर येथे होते.साधी राहणी आणि उच्च विचारसरणी आणि प्रामाणिकपणाचा दावा करणाऱ्या केजरीवाल यांच्या पक्षाने निवडणूक निधी जणविण्यासाठी गुरूवारी नागपूर येथील एका फाईव्हस्टार हॉटेलमध्ये डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती.दहा हजार रूपये देणाऱ्या आम आदमीला या पार्टीत सहभागी करून घेण्यात आले होते.या आम आदमीपुढे बोलताना केजरीवाल यांनी मोदीबरोबरच मिडियालाही टार्गेट केले.
केजरीवाल यांनी घुमजाव केलेले असतानाच आज दिल्लीत आपच्या नेत्यांनी केजरीवाल यांच्या वक्तव्याचे समर्थन केले.आपच्या नेत्यांनी मिडियाच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे जाण्याची धमकीच माध्यमांना दिली.आपचे नेते संजय सिंह,आशुतोष,आशिष खेतान आणि दिलीप पांडे म्हणाले,मिडियावर संशय घेणे चुकीचे नाहीगेल्या काही दिवसात इंडिया टीव्ही,इंडिया न्यूज,झी न्यूज ,टाइम्स ऩाऊ यांनी केजरीवाल आणि आपच्या विरोधात मोहिमच उघडली आहे.या चॅनल्सच्या बातम्याचे फुटेज आमच्याकडे असून त्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे संजय सिंह यांनी सांगितले.
केजरीवाल म्हणाले,आमची सत्ता आल्यावर मिडियावाल्यांची चौकशी करून सगळ्यांना तुरूंगात टाकू.
आपल्या विधानाचे गांभीर्य़ केजरीवाल यांच्या तेव्हा लक्षात आले जेव्हा याची लाईव्ह बातमी वाहिन्यांवरून दिसायला लागली.त्यानंंंंंंतर नेहमीप्रमाणे केजरीवाल यांनी आपल्या वक्तव्याचा इन्कार करीत मी असे बोललोच नाहीची टेप वाजवायला सुरूवात केली.
माध्यमामुळेच आपची निर्मिती झाली आहे.जो पर्यत माध्यमं केजरीवाल यांचं कौतूक करीत होते तोपर्यत मिडिया स्वतंत्र होता,चांगला होता.आता आपच्या नेत्यांच्या वागण्या-बोलण्यातला विरोधाभास मिडिया लोकांसमारो आणू लागल्याने आपचे पितळ उघडे पडायला लागले आहे त्यामुळे विरोधक सोडून माध्यमंच आपले विरोधक असल्यासारखे केजरीवाल आणि त्यांची टोळी माध्यमांवर आरोप करायला लागली आहे.माध्यमांना तुरूंगात टाकण्याची केजरीवाल यांची भाषा त्यांच्या फॅसिस्ट मनोवृत्तीची द्योतक आहे.त्याचा आम्ही तीव्र शब्दात धिक्कार करीत आहोत असे मत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम,देशमुख यांनी व्यक्त केले आहे.माध्यमांना धमक्या देणाऱ्या आपच्या नेत्यांचा समितीने तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.