पत्रकारांचे आज राज्यभर
आत्मक्लेष आंदोलन
आंदोलन यशस्वी करा :किरण नाईक

मुंबई :अर्ज, विनंत्या, आंदोलनं करूनही सरकार पत्रकारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने कोरोनानं बाधित झालेल्या पत्रकारांचे मृत्यूचे आकडे वाढत आहेत.. सरकारने पत्रकारांना वारयावर सोडण्याची जी भूमिका घेतली आहे त्याचा निषेध करण्यासाठी उद्या शनिवार दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्रातील पत्रकार आत्मक्लेष आंदोलन करणार आहेत..
मराठी पत्रकार परिषदेने या संदर्भात प़सिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, एस.एम.देशमुख हे आपल्या गावात एक दिवसाचे आत्मक्लेष आंदोलन करीत आहेत.. त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यातील पञकार आंदोलनात सहभागी होऊन देशमुख यांच्या भूमिकेस पाठिंबा देणार आहेत..
राज्यात एकट्या एप्रिल मध्ये 50 पत्रकारांचे बळी गेले आहेत. बळींचा एकूण आकडा आता 122 झाला आहे.. या महिन्यात जे पत्रकार मृत्युमुखी पडले ते सारे ३५ ते 50 वयोगटातील होते.. मराठी पत्रकार परिषदेने केलेल्या मागणीनुसार वेळीच सर्वांना लस दिली गेली असती तर यातील अनेकांचे प्राण वाचले असते.. म्हणजे हे सरकारच्या नाकर्तेपणाचे बळी आहेत.. पत्रकारांना योग्य ते उपचार मिळावेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र बेडची व्यवस्था करावी ही मागणी देखील सरकार पूर्ण करीत नाही.. फ्रन्टलाईन वर्करचा दर्जा दिला जात नसल्याने मुंबईत पत्रकारांना लोकलमधून प्रवास देखील करता येत नाही.. मृत पत्रकारांच्या नातेवाईकांना केंद्र सरकार पाच लाख रूपये देते, अन्य राज्यांनी ही अशी मदत सुरू केली आहे मात्र वारंवार पाठपुरावा करूनही राज्य सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अनेक संसार रस्त्यावर आले आहेत..
वारंवार मागण्या करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आत्मक्लेष करून घेण्याची वेळ पत्रकारांवर आली आहे.. शनिवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यत हे आंदोलन चालणार आहे.. पत्रकार घरात बसूनच अन्नत्याग करीत आपला तीव़ संताप व्यक्त करतील.. प्रत्येक तालुका आणि जिल्हयातील एकदोन पत्रकार संबंधित अधिकारी तसेच झेंडावंदनासाठी येणारया मंत्र्यांना निवेदन देतील.. सर्वांनी लॉकडाऊनचे नियम पाळत आणि स्वतःची योगय ती काळजी घेत हे आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे विश्‍वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे, सरचिटणीस संजीव जोशी, कोषाध्यक्ष विजय जोशी, महिला संघटक जान्हवी पाटील, राज्य प़सिध्दी प्रमुख अनिल महाजन, सोशल मिडिया सेलचे प्रमुख बापुसाहेब गोरे, तसेच सर्व उपाध्यक्ष, विभागीय सचिवांनी केले आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here