मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पनवेलनजिक कामोठे इथं उशिरा सभा घेऊन आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल सभेचे आयोजक शेकापचे रायगड जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील यांच्या विरोधात पनवेल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे याच्या काल रायगडात महाड आणि पनवेलनजिक कामोठे येथे प्रचारसभा आयोजित कऱण्यात आल्या होत्या.रायगडात मनसेनं शेकापचे उमेदवार रमेश कदम आणि मावळचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना पाठिंबा दिलेला आहे.महाड येथील सभा आटोपून राज ठाकरे रात्री सव्वा दहा वाजता कामोठे इथं पोहोचले.आचारसंहितेनुसार रात्री दहा नंतर सभा घेता येत नाहीत.असे असतानाही राज ठाकरे यांनी दोन मिनिटे का होईन सभेला संबंोधित केले.यावेळी बोलताना त्यांनी खराब रस्त्यामुळं आपणास पोहोचायला उशिर झाल्याचं सांगितलं.पूर्व निायोजित कार्यक्रमानुसार राज ठाकरेंची सभा 7 वाजता होणार होती.