आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक सिंधुदुर्ग नगरीत उभं राहात आहे.यासाठी 4 कोटी 55 लाख रूपये सरकारने मंजूर केले आहेत.या स्मारकाचा आणि पत्रकार भवनाचा एक आराखडा तयार करण्यात आला आहे.स्मारकाची वास्तू कशी असेल याचं कल्पना चित्र परवा सर्व पत्रकारांना दाखविण्यात आले.स्मारकाचं काम लवकरात लवकर सुरू व्हावं असा प्रयत्न आहे.–