केंद्र आणि राज्यातील भाजपचे सरकार आपले अपयश झाकण्यासाठी अवास्तव घोषणा करीत सुटले असल्याचा आरोप प्रदेश काॅंग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला.घोषणा आणि वस्तुस्थिती याचा दुरान्वयानंही संबंध नसल्याचेही अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांनी काल रेवदंडा येथे जाऊन ज्येष्ठ निरूपणकार डाॅक्टर आप्पासाहेब धमार्धिकारी यांची भेट घेतली.यावेळेस आप्पासाहेबांनी त्याचे शिवप्रतिमा भेट देऊन स्वागत केले.
त्यानंतर अलिबाग येथे त्यांनी काॅग्रेस कायकत्यार्शी चचार् केली.यावेळी स्थानिक नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभेत राष्ट्रवादीबरोबर पक्षाने केलेल्या आघाडीबद्दल उपस्थित कायर्कत्यार्ंनी तीव्र नापसंती व्यक्त केली.राष्ट्रवादीबरोबर पक्षानं युती केली पण राष्ट्रवादीने पाठित खंजीर खुपसल्याची भावना यावेळी व्यक्त कऱण्यात आली.पक्षाने रायगडकडे दुलर्क्ष केल्याने जिल्हायत पक्षाची वाताहत झाल्याचे यावेळी प्रदेशाध्यक्षांच्या कानावर घालण्यात आले.बैठकीस माजी आमदार माणिक जगताप,मुश्ताक अंतुले,मधुकर ठाकूर आदि उपस्थित होते.यावर जिल्हयातील अकायर्क्षम नेत्याची कुंडली आपल्याकडं असल्याच्या कानपिचक्या अशोक चव्हाण यांनी दिल्या.