सातारा इलेक्ट्रॉनिक मिडिया असोसिएशनच्या अध्यक्षपदी तुषार तपासे यांची एकमताने निवड करण्यात आली. कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्याचे ठरले होते. त्यानुसार उपाध्यक्षपदी सचिन जाधव तसेच प्रतिक भद्रे व महेश पवार यांचीही निवड करण्यात आली आहे. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : कार्याध्यक्ष ओंकार कदम, सचिव मधुसूदन पत्की, खजिनदार महेश नलावडे, संघटक विजय महाडिक, सहसंघटक राम पवार, रोहित भूतकर, तुषार जाधव, सहसचिव राहुल पवार, सहखजिनदार मयूर माने यांची एकमताने निवड करण्यात आली. असोसिएशनचे चांगले उपक्रम यापुढे सुरु ठेवून कॅमेरा प्रतिनिधींच्या मार्गदर्शनासाठी अधिक प्रयत्न करणार असल्याचे नमूद करुन नवनिर्वाचित अध्यक्ष तुषार तपासे यांनी सभासदांसाठी इन्शुरन्सचा मुद्दा प्राधान्याने अंमलात आणणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रसंगी विशेष निमंत्रित सदस्य तुषार भद्रे, मधुसूदन पत्की यांनी तपासे यांचे अभिनंदन केले. दरम्यान, जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी यांनी तुषार तपासे यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस,एम,देशमुख यांनी तपासे यांचे अभिनंदन केले आहे,तसेच केवळ इलेक्ट्रिनकच नव्हे तर प्रिन्ट मिडियातील पत्रकारांचे हक्क तसेच त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याच्या लढ्यात सातार इलेक्टॉनिक मिडिया असोसिएशन यापुढे देखील सहभागी होत राहिल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.