अँकर तरुणीची आत्महत्या

0
1099

मुंबई : मुंबईतील मालाडमध्ये एका तरुणीने इमारतीवरुन उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अर्पिता तिवारी (वय 25 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव आहे. मृत तरुणी इव्हेंट शोमध्ये अँकरिंग करायची.

मालाडच्या मालवणी परिसरात सोमवारी पहाटे ही घटना घडली. अर्पिताने मानवस्थळ इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरील, 1501 क्रमांकाच्या घरातून उडी घेऊन जीवन संपवलं. मालवणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला पाहून रहिवाशांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मात्र उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. या कृत्यामागचं नेमकं कारण शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत.

अर्पिता तिवारीचं लवकरच प्रियकरासोबत लग्न होणार होतं. सात वर्षांपासून एकत्र असलेली ही जोडी या इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरील घरात आली होती. हे घर तिच्या प्रियकराच्या ओळखीच्या व्यक्तीचं होतं. त्यामुळे इथे नेमकं काय घडलं या दृष्टीनेही पोलिस तपास करत आहेत. तसंच मोबाईल कॉल रेकॉर्डही तपासलं जाणार आहे.

एबीपी माझावरून साभार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here